क्राईम न्यूज

Thane Crime Branch News : डोंबिवलीत विदेशी दारू रॅकेटचा पर्दाफाश! 30 लाखांचा बनावट लेबल लावलेला विदेशी मद्यसाठा जप्त

Thane Crime Branch Latest News : ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई, चार आरोपी जेरबंद – बनावट लेबल, प्रिंटर, वाहनासह मोठा साठा हस्तगत

डोंबिवली | डोंबिवली शहरात विदेशी दारूच्या बेकायदेशीर व्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक-1 Thane Crime Branch Unit 1 ने गुप्त माहितीच्या आधारे सुदामवाडी परिसरात धाड टाकत 30 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा बनावट लेबल्स, प्रिंटर मशिन्स व वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. Thane Latest News

गोव्याहून कमी दरात खरेदी केलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बॉटल्स डोंबिवलीत आणून त्यावर बनावट बॅच नंबर, उत्पादन तारीख व एक्सपायरी डेट छापले जात होते. बनावट लेबल्सने सुसज्ज बॉटल्स नंतर महाराष्ट्रभर विकल्या जात होत्या. ही धंद्याची चेन दोन दिवसांच्या तपासणीत उघडकीस आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने 4 जून रोजी रात्री दरम्यान महिंद्रा पिकअप (क्र. MH-05-FJ-7884) थांबवून तपासणी केली. वाहनचालकाकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे लक्षात आल्यानंतर, त्याने जवळच्याच सुदामवाडीतील एका कोसळलेल्या घराकडे पथकाचे लक्ष वेधले. या ठिकाणी साठवलेले 18,290 बॉटल्स (447 बॉक्सेस), Heat Gun, Mini Printer, Cartridge, आणि हजारो बनावट लेबल्स सापडले.

जप्त केलेल्या बॉटल्समध्ये Royal Challenge, McDowell’s, OakSmith, Budweiser, Carlsberg, Kingfisher आदी लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश आहे. बनावटगिरीसाठी वापरलेले उपकरणे आणि लेबल्स हे अत्यंत हुबेहूब असून, सामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता होती.

अटक आरोपी –
1.श्रीकांत तोकडे (27 वय ) – वाहन चालक
2.वकील मंडल (23 वय) – क्लिनर
3.रवी तिवारी (30 वय)
4.संजीत यादव (19 वय) – मद्य साठवणूक व विक्रीत सहभागी

सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी 9 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

ठाणे गुन्हे शाखेची ही कारवाई अवैध मद्य व्यापार करणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली असून, या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सचिन गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे, दिपक घुगे, पोलीस उपनिरीक्षक, रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, सुनिल माने, दिपक जाधव, पोलीस हवालदार संदीप महाडिक, दिपक जाधव,बाळू मुकणे, पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केलेली आहे.

vivek

Recent Posts