क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime Branch News : ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! – 1 कोटींहून अधिक किंमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन) जप्त; अंमली पदार्थ विकणाऱ्या 6 आरोपींना अटक

Thane Police Busted Drug Racket : खंडणी विरोधी पथकाकडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीत 999 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

ठाणे :- ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch खंडणी विरोधी पथकाने एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. international Drug Connection या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 कोटी 9 हजार 200 किंमतीचा 999.2 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आणि इतर साहित्य जप्त केले आहे. Thane Police Latest Crime News

कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम आरोपी सचिन सुभाष चव्हाण यास ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या आरोपी रवि शामवीर डागुर याला ताब्यात घेतले असता, त्याच्या अंगझडतीत व घरझडतीत मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ सापडला.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींकडून सुमारे 1 कोटींहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनिय कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0