क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime Branch : ठाण्यात गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पिस्टलसह आरोपीला बेड्या

Thane Crime Branch Latest News : थर्टी फर्स्टच्या जल्लोषात मिठाचा खडा टाकण्याचा कट उधळला; खारीगावच्या तरुणाकडून देशी बनावटीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त, गुन्हे शाखेची मोठी कामगिरी!

ठाणे | नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर रोषणाईने न्हाऊन निघाले असताना आणि जल्लोषाचे वातावरण असताना, ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-1 ने एक अत्यंत महत्त्वाची कारवाई केली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री गुन्हेगारांकडून होणारी संभाव्य अनुचित घटना पोलिसांनी सतर्कतेने रोखली असून, एका इसमाला मुंबा रेतीबंदर परिसरातून बेकादेशीर पिस्टलसह जेरबंद केले आहे. Thane Latest Crime News

गोपनीय बातमी आणि मुंबा रेतीबंदरवर सापळा

गुन्हे शाखा घटक 1 चे Thane Crime Branch Unit 1पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे यांना थर्टी फर्स्टच्या दिवशी सायंकाळी एक विश्वसनीय माहिती मिळाली होती. एक तरुण मुंबा रेतीबंदर रोडवर अवैध शस्त्रासह येणार असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. साध्या वेशात पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या फिलिप पीटर तुर्का (वय 27) या तरुणाला पोलिसांनी अडवले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे 01 देशी बनावटीचे पिस्टल आणि 02 जिवंत काडतुसे सापडली.

आरोपीला 3 जानेवारीपर्यंत कोठडी

धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवण्यापासून ते राजकीय रणधुमाळीपर्यंत ठाण्यात सध्या वातावरण तापलेले असतानाच, अशा प्रकारे शस्त्र मिळणे ही चिंतेची बाब मानली जात होती. मात्र, पोलिसांनी वेळीच या तरुणाला बेड्या ठोकल्या. आरोपी फिलिप तुर्का हा कळव्यातील खारीगावचा रहिवासी असून, तो हे शस्त्र कशासाठी आणि कोणाला विकण्यासाठी घेऊन आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 3 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पडली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेचा हा एक भाग मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0