क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Chain Snacher News : ठाणे पोलीसांच्या कारवाईत चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 36 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!

Thane Police Arrested Chain Snacher Gang : इराणी टोळी व शिकलगार टोळीचे सदस्य अटक,ठाणे आणि नवी मुंबई पोलीस ठाण्यात 29 गुन्हे उघडकीस

ठाणे: ठाणे पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, मोटार वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेची मालमत्ता मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली होती.

ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch तपासात गुप्त बातमीदारांच्या माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू ठेवण्यात आला होता. या तपासात गुन्हे शाखा, घटक-3 कल्याण येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळून मोठ्या यशस्वी कारवाई केली आहे.

तपासादरम्यान, इराणी टोळी व शिकलगार टोळीचे सक्रीय सदस्यांची हालचाल पाळत ठेवून अटक करण्यात आली. यामध्ये इराणी टोळीचे सदस्य बसीन युसुफ अली सय्यद उर्फ वसिम काला (वय 30), कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी (वय 33) आणि शिकलगार टोळीचे सदस्य शिवासिंग अमिरसिंग बावरी (वय 25), पुनमकौर अमिरसिंग बावरी (वय 37) यांना ताब्यात घेतले आहे.चौकशीत समोर आले की या आरोपींवर ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई पोलीस ठाण्यात एकूण 29 गुन्हे दाखल आहेत, ज्यात दरोडा- 1, चेन स्नॅचिंग- 20, मोटार वाहन चोरी- 5 आणि घरफोडी चोरी-3 गुन्हे आहेत.कारवाईत एकूण 36 लाख 29 हजार 725 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 6 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-1) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, विनोद पाटील, पोलीस अमलंदर दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, सुधीर कदम, सचिन भालेराव, वसंत चौरे, पांडुरंग भांगरे, विजय जिरे, विलास कड्डु, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अमलंदर ज्योत्स्ना कुंभारे, मंगल गावित, अमोल बोरकर यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0