क्राईम न्यूज

ठाणे ; दिवा परिसरात भरदिवसा घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास

Diva Robbery News : दिवा भागातील एका घरामध्ये भर दिवसा चोरी करत 3 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

ठाणे :- जिल्ह्यातील घरफोडीचे सत्र Thane Robbery News सुरूच असून चोरटयांनी मागच्या काही दिवसात चोरटे भर दिवसा घरफोडी करत असल्याने त्यांच्यावर कोणाचा धाक राहिला नसल्याची चर्चा आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या तिसाई नगर, दिवा पूर्व भागातील एका‌ घरामध्ये कुलूप तोडून चोरटयांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 3 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.Diva Gold Robbery News याप्रकरणी दिनेश नंदकुमार बंडबे (31 वर्ष, रा. तिसाई नगर दिवा पूर्व) यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडबे हे दिव्यातील तिसाई नगर येथील एका सोसायटीत राहायला आहेत. फिर्यादी 30 ऑगस्ट रोजी घराबाहेर गेले होते. चोरटयांनी घराच्या बाहेरील कुलूप कशाचातरी सहाय्याने तोडले आणि आत प्रवेश केला. कपाट उघडून दागिने आणि रोख रक्कम असा 3 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305(अ),331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे करत आहेत. Thane Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago