Thane Breaking News : ठाण्यात आज ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसे आणि शिवसेना नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे लक्ष

Rajan Vichare And Avinash Jadhav : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार? ‘ठाकरे ब्रँड’ टिकवण्याची कार्यकर्त्यांची मागणी ; राजन विचारे आणि अविनाश जाधव घेणार एकत्रित पत्रकार परिषद; युतीची घोषणा होण्याची शक्यता
ठाणे :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येणार का, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. ‘ठाकरे ब्रँड’ टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, काल (गुरुवार) ठाणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे Rajan Vichare आणि मनसेचे नेते अविनाश जाधव Avinash Jadhav हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. पहिल्यांदाच ही पत्रकार परिषद एकत्रितरित्या होत असल्याने यातून दोन्ही पक्षाचे नेते काय भूमिका मांडणार, युतीची घोषणा होणार की केवळ स्थानिक प्रश्नांवर एकत्र येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बदललेली समीकरणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवसेनेची दोन शकले पडली आहेत. विशेषतः मुंबई आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांवर शिवसेनेची सत्ता होती आणि ठाण्यातूनच शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा आली होती. त्यामुळे या दोन्ही महापालिका शिवसेनेसाठी महत्त्वाच्या आहेत.
शिवसेनेची झालेली दोन शकले आणि भाजपची वाढती आक्रमकता पाहता, मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत.
महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकारण तापले असून, महाविकास आघाडीतील ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये सातत्याने बैठका होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत राजन विचारे, अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण उपस्थित होते. या बैठकांमधूनच आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी तयार झाल्याचे मानले जात आहे.


