ठाणे

Thane Breaking News : ठाणे जिल्ह्यात भाजपला जबर धक्का! 8 नगरसेवकांचा ‘शिंदे गटात’ प्रवेश; नगराध्यक्षांचाही समावेश

Thane Latest Political Update : ‘शिंदे यांच्या विकासकामांनी प्रेरित’; ‘परिवर्तन पॅनेल’चा शिवसेना पक्षात समावेश

ठाणे :- जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, मुरबाड नगरपंचायतीतील भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नगरपंचायतीतील 17 पैकी तब्बल 8 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मुरबाडमधील भाजपची ताकद लक्षणीयरीत्या घटली असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचाही समावेश

भिवंडीतील पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष रामभाऊ भगवान दुधाळे, उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास वारघडे, गटनेते मोहन भालचंद्र गडगे, बांधकाम सभापती उर्मिला सुजित ठाकरे, पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर आंबवणे, नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव, रविना विनायक राव, अनिता संतोष मारके, तसेच इतर कार्यकर्ते विकास वारघडे, सुजित ठाकरे आणि नंदकुमार जाधव यांचा समावेश आहे. या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या ‘परिवर्तन पॅनेल’सह शिवसेनेत प्रवेश केला आहे. Murbad bjp nagarsevak join Shivsena

भाजपवर निधी न देण्याचा आरोप

या पक्षप्रवेशाचे कारण स्पष्ट करताना माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “भाजपकडून आमच्या मुरबाडच्या विकासकामांसाठी निधी दिला जात नव्हता. जाणूनबुजून कामे डांबली जात होती. यामुळे आम्ही भाजपपासून वेगळे होत परिवर्तन पॅनेल स्थापन केले होते.” त्यांनी पुढे सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा खरा विकास होताना आम्ही पाहिला आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी या सर्व नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, “सर्व नगरसेवक सातत्याने निधीसाठी आग्रही असतानाही मुरबाड शहर वंचित राहत होते. आता मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शिवसेना पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

vivek

Recent Posts