मुंबईठाणे
Trending

Thane Breaking News : शरद पवार गटाला मोठा झटका ; माजी महापौर यांचा शिंदे गटात प्रवेश

Sharad Pawar Party Member Joined Eknath Shinde Shivsena : ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाण्यात शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुरुंग

ठाणे :- सर्वोच्च न्यायालयाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आलेल्या निकालानंतर शिवसेना शिंदे Shivsena Shinde Group गटाकडून इतर पक्षांना मोठा धक्का दिला जात असल्याच्या बातम्या येत आहे. मागील तीन दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुरुंग लावण्याचा कार्यक्रम सध्या चालवत आहे.

जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे आजही शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जोरदार धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी महापौर मनोहर साळवी Manohar Salvi माझी नगरसेवक मिलिंद साळवी माजी नगरसेविका अर्पणा साळवी आणि माझी नगरसेविका भारती गायकवाड Bharti Gaikwad यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला असून भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0