क्राईम न्यूज

Thane Breaking News : ‘खरेदीखत’ देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितली; ठाणे ACB चा ‘ऑपरेशन रंगेहात’, लोकसेवक आणि एजंट जाळ्यात!

Thane ACB Trap Latest News : मूळ दस्तऐवज मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला मनस्ताप; 35 हजार रुपये स्वीकारताना खासगी इसम ताब्यात

ठाणे :- सरकारी कार्यालयात अडकलेले तुमचे काम पूर्ण करण्यासाठी ‘लाच’ देणे हाच अंतिम पर्याय असतो, हे पुन्हा एकदा ठाणे शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कारवाईतून सिद्ध झाले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाच्या आईचे मूळ खरेदीखत देण्यासाठी तब्बल 70,000 रुपये लाचेची मागणी करणाऱ्या वरिष्ठ लिपिक आणि त्याच्या खासगी हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. Thane ACB Latest News

तक्रारदार व्यक्तीच्या आईने 1987 मध्ये भाईंदर येथील गृहनिर्माण संस्थेत एक गाळा खरेदी केला होता आणि त्याचे मूळ खरेदीखत सह निबंधक वर्ग-1, ठाणे कार्यालयात जमा होते. हे महत्त्वाचे दस्तऐवज परत मिळवण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. या प्रकरणात लोकसेवक म्हणून दीपक गुंगाराम इसळ (वय 34), वरिष्ठ लिपिक, आणि खासगी इसम म्हणून अजित विठ्ठल कोकमकर (वय 50) यांचा समावेश आहे. Thane Latest Bribe News

लोकसेवक दीपक इसळ याच्या सांगण्यावरून खासगी इसम अजित कोकमकर याने 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांच्या यादीमागे ‘70,000’ असा आकडे लिहून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचेची तक्रार केल्यानंतर एसीबीने पडताळणी केली. तडजोडीअंती लाचेची रक्कम 65,000 रुपये दोन टप्प्यांत स्वीकारण्याचे ठरले.आज (30 ऑक्टोबर 2025) रोजी आयोजित केलेल्या सापळ्यात, खासगी इसम अजित कोकमकर याने लोकसेवक दीपक इसळ याच्यासाठी तक्रारदाराकडून 35,000 ची लाचेची रक्कम स्वीकारताना दुपारी रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईत लिपिक दीपक इसळ याचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसेवक आणि खासगी इसम दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिवराज पाटील (पोलीस अधीक्षक, ACB, ठाणे परिक्षेत्र, ठाणे), भागवत सोनावणे (अपर पोलीस अधीक्षक, ACB, ठाणे परिक्षेत्र, ठाणे), सुहास शिंदे (अपर पोलीस अधीक्षक, ACB ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे). यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मिला पाटील (पोलीस निरीक्षक,ACB ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे). यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago