Thane Crime Branch Latest News : 11 हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 11 कंपन्यांच्या नावाखाली चालवला होता लुटीचा धंदा
ठाणे | जादा परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ‘TWJ Associated Pvt. Ltd.’ या कंपनीच्या विरोधात ठाणे पोलिसांनी Thane Police धडाकेबाज कारवाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 1200 कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या या टोळीतील मुख्य आरोपी समीर नार्वेकर, अमित बालम आणि नेहा नार्वेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. Thane Police Latest News
असे विणले होते फसवणुकीचे जाळे
आरोपींनी ‘TWJ’ या नावाने हॉटेलिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, इव्हेंट मॅनेजमेंट, आयटी आणि लॉजिस्टिक अशा तब्बल 11 वेगवेगळ्या कंपन्या उघडल्या होत्या. “अशक्यप्राय परतावा” देण्याचे आमिष दाखवून ठाण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांतील सुमारे 11,000 गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास संपादन केला आणि त्यानंतर कोट्यवधी रुपये घेऊन आरोपी फरार झाले होते.
गुन्ह्याचा असा झाला उलगडा
विक्रोळीचे रहिवासी संजय मापुसकर यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हा आकडा 3 कोटींच्या आसपास होता, मात्र तपासाचे चक्र फिरताच हा घोटाळा तब्बल 1200 कोटींच्या घरात असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आपले अस्तित्व लपवून वावरत होते, मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी त्यांना अटक केली. Thane Crime Branch Latest News
पोलिसांचे आवाहन: आपली तक्रार नोंदवा!
या महाघोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने अनेक गुंतवणूकदार अद्याप समोर आलेले नाहीत. ठाणे पोलिसांनी आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांची TWJ कंपनीने फसवणूक केली आहे, त्यांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक: ८८०५४८६१०० / ०२२-२५३९८५८६
या पथकाने बजावली कामगिरी
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त पराग मणेर आणि पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…