Thane BMC News : निलेश राणे यांच्या शिवप्रहार संघटनेकडून ठाण्यातील अनधिकृत बांधकाम आणि भूमाफियांविरोधात पालिका आयुक्तांना पत्र
Vivek Vasant Jadhav’s letter to Thane Municipal Commissioner : संघटनेचे उपाध्यक्ष विवेक वसंत जाधव यांचे ठाणे पालिका आयुक्तांना पत्र, पत्रात विसावा हॉटेल विरोधात तक्रार
ठाणे :- आमदार निलेश नारायण राणे Nilesh Rane यांच्या संघटनेने ठाण्यातील भूमाफिया तसेच अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पत्र ठाणे महानगरपालिकेचे Thane Municipal Commissioner आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे. शिव प्रहार कामगार संघटनेच्या वतीने हे पत्र आयुक्तांना देण्यात आले असून त्यामध्ये ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेल विसावा Thane Hotel Visava याचा उल्लेख करून हॉटेलचा काही परिसर हा अतिक्रमण केल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. तसेच, अधिकारी आणि कर्मचारी यांना भूमाफियांकडून काही आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा दावाही पत्रात केल्याचं दिसत आहे. Thane Breaking News
संघटनेचे उपाध्यक्ष विवेक जाधव पत्रात काय म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थेतील सह आयुक्त, अधिकारी, कर्मचारी वर्गाचे आर्थिक समीकरण असल्या कारणामुळे अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शहरांचे विद्यांतुपीकरन होत असून आपत्ती काळात त्यातून उद्धभवणारे मोठे धोके लक्षात घेता आपण ह्या ढिम्म कारभाराकडे लक्ष द्यावे हि विनंती.
6 नोव्हेंबर रोजी अशाच एका अनधिकृत बांधकामाची माहिती नौपाडा कोपरी प्रभाग समिती, अतिक्रमण विभाग सह आयुक्त व सहकारी कलर्क ह्यांच्या निदर्शनास आणून देखील सादर भूमाफियाला थातुर माथूर कार्यवाही करून प्रोसाहन व बळ दिल जात आहे. तसेच सदर भू माफियाला माझा पत्राची कॉपी दिल्यामुळे माझा मोबाईल नंबर घेऊन सदर भूमाफिया मला प्रकरण मागे घ्या किंवा सेटलमेंट करा असे वारंवार फोन करत आहेत. Thane Breaking News
गॅलेरीया बिल्डिंग तलावपाळी, डॉ मूस रोड येथे फूटपाथ व सोसायटीचे गेट पूर्णपणे बंद करून अनधिकृत पद्धतीने महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रथम एक शॉप उभे केले गेले आहे त्या नंतर हॉटेल विसावा ह्यांच्या कडून काहीस अतिक्रमण केले गेले आहे त्याचमागे अनधिकृत पाने सोसायटी चा रास्ता अडवण्यासाठी अडथळा निर्माण केली गेली आहे. संपूर्ण 10 बाय 25 फूट संपूर्ण अतिक्रमण आहे.
तरी आपणास विनंती आहे आशा अनधिकृत दुकानांवर व भू माफियांवर एम आर टी पी सारखे गुन्हा दाखल करावा व सोसायटीला गेट खुले करून देण्यात यावे असे विनंती आयुक्तांना पत्रात केली आहे.