ठाणे

Thane BMC Election News : ठाण्यात ‘ठाकरे युती’ला प्रशासकीय दणका! प्रभाग 17 आणि 18 मध्ये अर्ज बाद; अविनाश जाधवांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

Thane Thackeray Brother News : “अधिकारी नेत्यांच्या तालावर नाचतात”; मनसेच्या प्राची घाडगे आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पत्ता कट झाल्याने खळबळ

ठाणे | ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या Thane BMC Election अर्ज छाननी प्रक्रियेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. तांत्रिक कारणांचे बोट दाखवत प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना (UBT) आणि प्रभाग क्रमांक 18 मधून मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत प्रशासकीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा केला आहे. Thane Political Latest News

प्रभाग 17: ठाकरे गटाच्या उमेदवाराचा संताप

प्रभाग 17 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मनोज शिंदे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.

बाद होण्याचे कारण: बँकेचे स्टेटमेंट न देणे आणि स्वाक्षरी नसल्याचे कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.

उमेदवाराचा आरोप: “मी गरीब घरचा मुलगा असल्याने माझ्यावर अन्याय झाला. मला त्रुटी सुधारण्यासाठी वेळ दिला नाही आणि मुदत संपण्याच्या 10 मिनिटे आधी प्रतिज्ञापत्र मागितले. हा सर्व प्रकार प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज शिंदे यांच्या सांगण्यावरून झाला असावा,” असा संशय उमेदवाराने व्यक्त केला आहे.

प्रभाग 18 : मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज अवैध
प्रभाग 18 मधून मनसेच्या अधिकृत उमेदवार प्राची घाडगे यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.

काय घडले?

वेळेत कागदपत्रे देऊनही पोलिसांनी आत सोडण्यास उशीर केल्याचा दावा घाडगे यांनी केला आहे. जेव्हा त्या आत पोहोचल्या, तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता ‘कागदपत्रे नाहीत’ असे सांगत अर्ज अवैध ठरवला.

अविनाश जाधव यांचा ‘आरक्षण’ आणि ‘भ्रष्टाचारा’चा प्रहार
या संपूर्ण प्रकरणावर मनसेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकारी वैशाली मॅडम यांच्यावर तोफ डागली आहे. जाधव यांचे गंभीर आरोप खालीलप्रमाणे:

नियमांचे उल्लंघन: “निवडणूक अधिकाऱ्यांनी सकाळी 11 वाजता फॉर्म डिस्प्ले करणे आवश्यक होते, मात्र तो साडेतीन वाजता केला. हे थेट नियमांचे उल्लंघन आहे.”

संदेहास्पद हालचाली “निवडणूक अधिकाऱ्यांची मुलगी फाईल घेऊन आली होती. विचारणा केली असता औषधांची फाईल असल्याचे सांगण्यात आले. ही फाईल व्हॉट्सॲपवर मागवता आली नसती का? हा प्रकार संशयास्पद आहे.”

अनधिकृत बांधकामात सहभागी असलेले भ्रष्ट अधिकारी आता निवडणूक अधिकारी बनले आहेत. या आरओंवर (RO) तत्काळ एफआयआर दाखल करावा, अशी मागणी जाधव यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

vivek

Recent Posts