क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane ACB Trap News : कारवाई थांबवण्यासाठी दर महिन्याचा “हफ्ता”; शिधावाटप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Thane ACB Trap News : दर महिन्याला 2 हजार, सहा महिन्यांचा 12 हजार रुपये हफ्ता उकळण्याचा प्रयत्न; 48 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

ठाणे :- शिधावाटप दुकानदारांकडून महिन्याला 2000 रुपये लाचेचा Thane ACB Bribe News हफ्ता घेणाऱ्या शिधावाटप निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक Thane Anti Corruption Bureau News विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सहा महिन्यांसाठी प्रत्येकी 12,000 रुपयांची मागणी करून एकूण 48,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या या निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव सागर साहेबराव वराळे असे असून ते शिधावाटप निरीक्षक (तपासणी), वर्ग-3, नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई येथे कार्यरत होते. तक्रारदाराने आपल्या चार शिधावाटप दुकानांबाबत कारवाई टाळावी, म्हणून निरीक्षक वराळे यांनी महिन्याला प्रत्येकी 2,000 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, एकूण सहा महिन्यांसाठी 48,000 रुपयांची रक्कम स्वीकारली गेल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदाराने (15 एप्रिल 2025) रोजी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 19 मे 2025 रोजी पडताळणी दरम्यान निरीक्षक वराळे यांच्याकडून तक्रारीत नमूद रक्कम स्वीकारल्याचे ध्वनीमुद्रणाद्वारे स्पष्ट झाले. त्यानंतर आजवरच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (संशोधन 2018) कलम 7 अंतर्गत कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाई रुपाली पोळ, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी शिवराज पाटील, (पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे),संजय गोवीलकर, (अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे),सुहास शिंदे (अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे), यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, अधिक तपास सुरू आहे. नागरी पुरवठा व्यवस्थेतील ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर इतर संबंधितांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0