Thane ACB Trap News : पत्रकाराचा बुरखा फाटला! बदनामीची धमकी देऊन सह दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडे 25 लाखांची खंडणी

Thane Journalist Bribe News : ‘सामाजिक कार्यकर्त्या’च्या साथीने 25 लाखांची मागणी; ठाणे खंडणी विरोधी पथकाने रेस्टॉरंटमध्ये सापळा रचून रंगेहाथ पकडले
ठाणे :- पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा मुखवटा घालून एका सह दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अधिकाऱ्याला नोकरीतून निलंबित करण्याची धमकी देत आणि वृत्तपत्रांमध्ये तसेच सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित न करण्यासाठी या आरोपींनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. Thane Latest News
खंडणी विरोधी पथकाने तक्रारदार अधिकाऱ्याच्या मदतीने कळव्यातील पारसिक नगर येथील साई पूजा रेस्टॉरंटमध्ये आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी अजय पोपटलाल धोका (वय 46) याने तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम (20 लाख) स्वीकारताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा साथीदार मनोज विजय मयेकर (वय 52) यालाही मीरा भाईंदर परिसरातून अटक करण्यात आली. Thane Latest Bribe News
या दोन्ही आरोपींनी स्वतःला ‘पत्रकार’ आणि ‘सामाजिक कार्यकर्ते’ भासवून अधिकाऱ्याची बदनामी करण्याची आणि त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक झाल्यामुळे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेने यशस्वीरित्या पार पाडली असून, या खंडणीखोरांना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



