Thane ACB Trap : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात, कारवाईचा सुगाव लागतातच तलाठ्याचा पळ
Anti Corruption Bureau Arrested Bribe Talathi : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे याची कारवाई ; तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
रायगड :- सुधागड तालुक्यातील तात्कालीन सजा नाडसुर सध्या नेमणुक वाघोशी सज्जाचे तलाठी उध्दव सुदाम गुंजाळ (50 वय) यांना तीन लाखांची लाच मागितल्या 3 Lakh Bribe प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तलाठी येणे तक्रारदार यांच्याकडे तीन लाखांची लाच मागितली होती.या प्रकरणी लाचखोर तलाठी एसीबीच्या ACB Arrested Talathi For Bribe जाळ्यात अटकला आहे. तलाठ्याला तक्रारदार याच्या हालचालीवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. Anti Corruption Bureau Latest News
यांतील तक्रारदार यांनी मुखत्यारपत्र घेतलेल्या मालकाची (मौजे धोंडसे,) ता. सुधागड येथे असलेल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायचे असल्यामुळे रस्ता बनविला होता. रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने जागेत मातीचे बेकायदेशिर उत्खनन केले असल्याचे आरोपी तलाठी गुंजाळ यांनी तक्रारदार यांना सांगून रूपये दहा लाख दंड भरावा लागेल असे सांगितले. परंतु कोणत्याही प्रकारे कारवाई न करण्याकरिता तीन लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी Anti Corruption Bureau Latest News
तसेच लाचखोर तलाठी याने 7 ऑगस्ट दरम्यान तहसिल कार्यालय सुधागड येथे तक्रारदार यांचेकडे तीन लाखांची लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. परंतु नमुद आरोपी यांस तक्रारदार यांचे हालचालींवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपी तलाठी उध्दव गुंजाळ यांचेविरूध्द पाली पोलीस ठाणे येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास ॲन्टी करप्शन ब्युरो रायगड़, अलिबाग कार्यालयामार्फत सुरू आहे.सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे,महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशीकांत पाडावे पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग यांनी कारवाई करत लाचखोर तलाठ्याला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News