Thane ACB News : निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणी दोघांना अटक; ठाणे एसीबीची कारवाई

Thane ACB Take Action Against Mandar Gavade And Sandeep Pavaskar : 25 लाखांच्या लाच प्रकरणात मंदार गावडे आणि संदीप पावसकर गजाआड; बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सवरून कारवाई
ठाणे :- ठाणे महापालिकेचे (TMC) निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे Shankar Patole यांच्या लाचखोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात पाटोळे यांचे दोन कथित साथीदार मंदार गावडे Mandar Gawade आणि संदीप पावसकर Sandeep Pavaskar यांना अटक केली आहे. लाचेच्या रकमेच्या बँक व्यवहारांची तपासणी आणि कॉल तपशील तपासल्यानंतर एसीबीने ही कारवाई केली आहे. Thane ACB Latest News
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील नौपाडा भागातील एका जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी तत्कालीन अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाख रुपयांची लाच मागितली होती. बांधकाम व्यावसायिकाने याबद्दल मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने थेट ठाणे महापालिका मुख्यालयातून पाटोळे यांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई पालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर पाटोळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
दोन साथीदारांना अटक
मुंबई एसीबीकडून हे प्रकरण ठाणे एसीबीकडे वर्ग झाल्यानंतर तपास सुरू झाला. पाटोळे आणि त्यांचे दोन साथीदार यापूर्वीच अटक होऊन सध्या जामिनावर आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मंदार गावडे आणि संदीप पावसकर यांनी लाच देण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकाची पाटोळे यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. तसेच, त्यांच्या बँक खात्यातून काही व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पुराव्यांच्या आधारावर एसीबीने या दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.



