ठाणे : आचार संहितेच्या काळात 9.13 कोटी रोकड जप्त; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात
Thane Police : ठाणे पोलीस दलाच्या 7980 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 300 रुट मार्च !
ठाणे :- आचार संहितेच्या Thane Code Of Conduct काळात मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीत 9 कोटी 13 लाख 71 हजार 600 रुपयांची रोकड जप्त करण्यात आला आहे. 9 Crore Money Siezed By Thane Police ठाणे पोलीस आयुक्तालयातील 7980 अधिकारी आणि अंमलदारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.मतदान प्रक्रिया सूरळीत व निर्विघ्नपणे पार पडण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून सर्वतोपरी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यासाठी वापरण्यात येणारे मनुष्यबळ
1.मतदान प्रक्रीया पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकुण 7980 पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत.
2.2088 होमगार्ड्स तैनात करण्यात आलेले आहेत.
3.राज्य राखीव पोलीस बल (S.R.P.F) च्या एकुण 3, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल (C.I.S.F) च्या 5, केंद्रिय राखीव पोलीस दल (C.R.P.F) च्या 3, सिमा सुरक्षा बल (S.S.B) च्या 4, उत्तराखंड राज्य राखीव दल (S.A.P.F) येथील 3 अश्या एकुण 18 कंपन्या अतिरीक्त मनुष्यबळ देखील तैनात करण्यात आलेले आहे.
4.याव्यतिरीक्त स्थानिक पातळीवर पोलीसांना मदत व्हावी या दृष्टीने नॅशनल कॅडेट कोअर (N.C.C) चे
1154, नॅशनल सर्विस स्किम (N.S.S) चे 358 व विशेष पोलीस अधिकारी (S.P.O) चे 15, R.S.P चे 14, सुरक्षा रक्षक 66, पोलीस मित्र 1052, स्काऊट ॲण्ड गाईड चे 20 असे एकुण 2679 इतके पोलीस व स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत.
पोलीस आयुक्तांकडून जनतेला आवाहन
20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडावी या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आली असून पोलीस यंत्रणा सर्वतोपरी सुसज्ज आहे. सर्व नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यादृष्टीने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सराईत
गुन्हेगारांवर खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
अ) एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या एकुण कारवाई :- 6
ब) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2024 कलम 126, 128 व 129 अन्वये कारवाई- 4081
क) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55, 56 व 57 अन्वये हद्दपार कारवाई- 116
ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अन्वये कारवाई :- 161
नाकाबंदी दरम्यान केलेली कारवाई
स्थानिक पोलीस व निवडणूकीसाठी स्थापन करण्यात आलेले एस.एस.टी/एफ.एस.टी. पथकामार्फत आचारसंहिता सुरू झाल्यापासून एकुण 9 कोटी 13 लाख 71 हजार 600 रूपये इतकी बेहिशोबी रोख रक्कम तसेच 13 लाख 26 हजार 376 रूपये इतक्या किंमतीचे सोने, चांदी जप्त करण्यात आलेली आहेत.
अवैध शस्त्रे जप्ती कारवाई
आचारसंहिता लागु झाल्यापासून पोलीस ठाणे पातळीवर विशेष अभियानाअंतर्गत कोंबींग ऑपरेशन, ऑपरेशन ऑल आऊट इत्यादी राबवून आतापर्यत 59 इतकी अग्निशस्त्रे, 85 जिवंत काडतूसे तसेच 252 चाकू/सुरे अशी हत्यारे जप्त करून संबंधीतांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
बेकायदेशिर दारू/अंमली पदार्थ/गुटखा जप्ती कारवाई
आचारसंहिता लागु झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 13 हजार लिटर बेकायदेशिर देशी/विदेशी व गावठी दारू जप्त करण्यात आली असून सुमारे 1 लाख 45 हजार 320 लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नाश करण्यात आलेला आहे. तसेच सुमारे 65 किलोग्राम गांजा, एम. डी. इत्यादी अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 1 कोटी 2 लाख 72 हजार 219 रूपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त करण्यात आलेला आहे.याव्यतिरीक्त आचारसंहितेचा भंग होणार नाही यादृष्टीने सतत लक्ष रहावे म्हणून संपूर्ण पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामधील प्रत्येक पोलीस ठाण्याकडून प्रत्येकी 5 ड्रोन कॅमेरेद्वारे निगराणी ठेवण्यात येत असून मतदानाच्या दिवशी ती अधिक परिणामकारक करण्यात येणार आहे.