ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची 8.77 लाखांची फसवणूक
Thane Share Market Fraud News : ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ; सायबर विभागाकडून आरोपींचा शोध
ठाणे :- शेअर मार्केटमध्ये Thane Share Market Fraud अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत MC STOCK CLUB.D1 या ग्रुप मध्ये शेअर्स कधी खरेदी केल्यास अधिकचा नफा मिळेल असं सांगून.एका तरूणाची 8.77 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी 27 वर्षीय तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार ठाणेनगर पोलीस ठाण्यात Thane Police Station अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Share Market Fraud News
खारटन रोड ठाणे पश्चिम या परिसरातील राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाला जानेवारी 2024 दरम्यान च्या काळात एका अनोळखी महिलेने कॉल करून MC STOCK CLUB.D1 या ग्रुपमध्ये खरेदी करण्यासाठी तरुणाला सांगितले. 8 लाख 77 हजार इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत तरुणाने 30 ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड),66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. Thane Latest Share Market Fraud News