Thackeray vs Shinde : ठाकरे गटाच्या वर्धापन दिनावर उद्धव ठाकरे यांचे खवळलेले वक्तव्य, श्रीकांत शिंदे यांचा बोचरा प्रतिप्रश्न
ठाणे | शिवसेना (ठाकरे गट) च्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जहरी टीका करत “हिम्मत असेल तर कम ऑन, किल मी” असे थेट आव्हान दिले. या वाक्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले की, “कम ऑन, हेल्प मी म्हणणाऱ्यांना वाचवायला धावून येणारे पहिले व्यक्ती एकनाथ शिंदे असतात.” Thackeray vs Shinde
शिंदे म्हणाले की, “आम्ही नेहमी वाचविण्याचाच विचार करतो, संपवण्याचा नाही. अनेकजण सिनेमातले संवाद वापरत असले तरी राजकारणात कृती महत्त्वाची असते,” अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शैलीवर केली.
ठाणे येथे आयोजित ‘डिप्लोमसी बाय डॉ. श्रीकांत शिंदे’ या मुलाखतीदरम्यान त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या 14 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ दौऱ्याचे अनुभव ठाणेकरांसमोर मांडले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी यावेळी शिंदेंची मुलाखत घेतली.
“मी कॉलेजमध्ये असताना खासदार झालो. माझ्यातील विद्यार्थी आजही जिवंत आहे. मी सतत अभ्यास करत असतो. भेट देणाऱ्या देशांचा अभ्यास केला. राष्ट्रप्रमुखांबरोबर बसून देशाची बाजू मांडली,” असे सांगतानाच त्यांनी लायबेरिया येथे सिनेटमध्ये भाषण करण्याची संधी मिळाल्याचा अभिमानही व्यक्त केला.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “पाकिस्तानचा बुरखा फाडून त्याचा खरा चेहरा जगासमोर मांडण्याची संधी या शिष्टमंडळातून मिळाली आणि ही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मिळाली.”
दौऱ्यात काही काँग्रेस नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून भारताची भूमिका समर्थपणे मांडली. पण याचवेळी राहुल गांधी पाकिस्तानच्या बाजूने बोलत होते,” असा जोरदार टोला शिंदे यांनी लगावला. तसेच, “काही लोकांना याचा त्रास झाला की माझ्या पेक्षा नवख्या खासदाराला कसा पाठवलं? पण प्रत्येकाला त्यांच्या लायकीनुसारच संधी दिली जाते,” अशीही टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…