महाराष्ट्रछ.संभाजी नगर
Trending

Thackeray Shivsena News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, हा नेता ठाकरेंची साथ सोडणार

Thackeray Shivsena News : तीस वर्षांपासून ठाकरेंचा खंदा समर्थक शिंदे गटात,शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना ठाकरे गटाकडून Shivsena Thackeray Group राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेगा प्लॅनिंग चालू असताना ठाकरेंना छत्रपती संभाजी नगर मधून मोठा धक्का बसला आहे.राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे, दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश का आलं? याची कारणं शोधण्याचं काम नेत्यांकडून केलं जात आहे. यातच आता पुढील काही महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासून जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं. दरम्यान, असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले Nandkumar Ghodele हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रभावित होऊन पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे ; नंदकुमार घोडेले

शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं की, “जवळपास 30 वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झालं आहे, त्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यानंतर त्याचा फटका बसला असं मला वाटतं. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणाशीही माझी नाराजी नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0