पनवेल जितिन शेट्टी : पनवेल तालुक्यातील सिडको अंतर्गत असलेल्या नौपाडा गावात पर्जन्यवाहिनी बंद झाल्याने पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे गावकऱ्यांचे नुकसान होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुढाकार घेत सिडकोच्या कामोठे नोड कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. पक्षाने तातडीने कारवाई करून पर्जन्यवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.नौपाडा गावाशेजारील जे.एन.पी.टी. ते कळंबोली सर्कल सर्व्हिस रोडवरील जागेवर बांधकाम व्यावसायिकाने पत्र्याचे कुंपण टाकून अतिक्रमण केल्याने पर्जन्यवाहिनी बंद झाली आहे. याबाबत गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सिडकोला माहिती असूनही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेना पक्षाने सिडकोला अतिक्रमण हटवून पर्जन्यवाहिनी नव्याने बांधण्याची विनंती केली आहे, जेणेकरून गावकऱ्यांना पाणी साचण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.निवेदन सादर करताना युवा सेना महानगर अधिकारी पनवेल महेश भिसे, शिवसेना शहर संघटक संतोष गोळे, शहर संघटिका संगीता ताई राऊत, उप शहरप्रमुख सचिन त्रिमुखे, तुषार शिंदे, कामोठे युवा विभाग अधिकारी मयुरेश सकपाळ, महिला उप शहरप्रमुख सुरेखा जाधव, विभाग संघटिका मीनाक्षी कांबळे, शाखा संघटिका सेक्टर १२ लीला जामदार आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. पक्षाने सिडकोला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले असून, यामुळे गावकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…