मुंबई
Trending

Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांना पक्षातून हकलपट्टी

Three Thackeray Member Group Joined Shinde Group : कोकणात ठाकरे यांना पुन्हा एकदा फटका बसणार, अनेक माजी आमदार आणि नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, कोकणातील तीन बड्या नेत्यांना पक्षाकडून बाहेरचा इशारा

मुंबई :- उद्धव ठाकरे गटाला परत एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आज दापोलीच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या दरम्यान अनेक प्रमुख नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. नुकतेच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कोकणातील तीन बड्या पदाधिकाऱ्यांना Three Thackeray Group पक्षातून हकालपट्टी करण्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आल्याचं पत्रकातून कळवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे 2 माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे 5 माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.रत्नागिरीतच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा चंग एकनाथ शिंदेंनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धवसेनेला राजापूर, लांजा तालुक्यात खिंडार पाडले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0