Thackeray Gat Meeting : ठाकरे गटाची हॉटेल ट्रायडन मध्ये महत्त्वाची बैठक
•पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते बैठकीला उपस्थित
मुंबई :- आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक मुंबईतील हॉटेल ट्रायडे मध्ये आयोजित केले आहे. बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह ठाकरे गटाचे दिग्गज नेते आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला आलेले यश याच पार्श्वभूमीवर विधानसभेची रणनीती आखली जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्यानेच निवडणूक लढवायचे असे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांनी पक्षाने ठरविलेले आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी म्हणजेच भाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षित प्रमाणे यश जरी आले असले तरी एक उमेदवार त्यांचा अयशस्वी ठरला आहे. तरीही यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकी त ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला यश आले आहे त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलाही यश संपादन करेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीने 31 जागांवर यश प्राप्त केले आहे. 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून त्याचप्रमाणे राजनीती करत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रणनीती आखली जाईल असे राजकीय विश्लेषण कडून सांगण्यात येत आहे. काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीच्या पूर्वीच सर्व पक्षांनी राजकीय गणित आणि समीकरणे आखण्यास सुरुवात केली आहे.