मुंबई

Thackeray Family Gave Vote : उद्धव ठाकरेसह ठाकरे परिवारांनी मतदान केले, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार

•मुंबई पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांची टक्कर

मुंबई :- राज्यात विधान परिषदेच्या चार जागांकरिता आज मतदान होत आहे. दोन शिक्षक मतदार आणि दोन पदवीधर मतदार याच्यात निवडणूक लढत आहे. भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबई मध्ये पदवीधर आणि शिक्षक उमेदवारांना मतदान केले जात आहे तर कोकण येथे पदवीधर मतदार तर नाशिक मध्ये शिक्षक मतदार यांच्या निवडणुका लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांची लढत भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मतदान केले आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत

  • ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट
  • शिवनाथ दराडे : भाजप
  • सुभाष मोरे : शिक्षक भारती
  • शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
  • शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी

  • अनिल परब शिवसेना ठाकरे गट
  • किरण शेलार : भाजप

कोकण पदवीधर मतदारसंघांत दोन उमेदवारांमध्ये लढत

  • निरंजन डावखरे : भाजप
  • रमेश कीर : काँग्रेस

नाशिकमधील प्रमुख लढती

  • संदीप गुळवे – ठाकरे गट
  • किशोर दराडे – शिंदे गट
  • ऍड महेन्द्र भावसार – अजित दादा गट
  • विवेक कोल्हे – अपक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0