महाराष्ट्र
Trending

Thackeray Dasara Melava : ‘शिवाजी पार्क’वर पुन्हा ठाकरेंचाच ‘आवाज’! उद्धव गटाला दसरा मेळाव्याची परवानगी

Thackeray Dasara Melava Latest News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेळावा; उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष

मुंबई :- शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर दाखल होण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यातून कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे-ठाकरे यांच्यातील रस्सीखेच

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क हे दसरा मेळाव्याचे मुख्य केंद्र राहिले आहे. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून या मैदानासाठी शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती. यंदा मात्र हा वाद जास्त न वाढवता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का?

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट तब्बल सव्वादोन तास चालली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते.

या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे, आगामी दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार का? आणि शिवसेना-मनसेमध्ये युती होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या दसरा मेळाव्याकडे आता केवळ शिवसैनिकच नव्हे, तर मनसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे भाषणातून काय ‘डरकाळी फोडणार’ आणि राज ठाकरे त्यात सामील होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0