मुंबई

18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू; सुप्रिया सुळे यांनी मिळवून दिला ‘ठाकरे फ्रेम’!

त्रिभाषा सूत्राविरोधातील विजयी मेळाव्यात ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षण

मुंबई | हिंदी सक्ती व त्रिभाषा सूत्राविरोधात शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या विजयी मेळाव्याचा काल (5 जुलै) ऐतिहासिक क्षण ठरला. 18 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. कार्यक्रमाच्या अखेरीस मंचावर जमलेले दृश्य अनेक राजकीय चाहत्यांच्या आणि मराठी अस्मितेच्या अंगणात आशेचा किरण देणारे ठरले.

कार्यक्रम संपल्यानंतर, उपस्थित सर्वच पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र आले. याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र उभं केलं. त्यांनी आदित्य यांचा हात धरून राज ठाकरे यांच्याजवळ उभं केलं, तर उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमित ठाकरे यांना आपल्या बाजूला बोलावलं.

यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोही काढला. ज्यात आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या बाजूला, तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे होते. हे दृश्य पाहून अनेकांना भावनिक आनंद मिळाला. राजकीय असहमतीच्या पार्श्वभूमीवर, हा ठाकरे कुटुंबाचा ऐक्य संदेश देणारा क्षण ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0