Thackeray Brothers Latest News : वांद्रेत मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला घरघर; भाजपमध्येही ‘नॉट रिचेबल’ नेत्यांनी पुकारले बंड
मुंबई | मुंबई महापालिकेच्या Mumbai BMC सत्तेसाठी ‘ठाकरे ब्रँड’ एकवटला असला, तरी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना दिलेल्या संधीमुळे वांद्रे, चांदिवली आणि वर्सोवा या भागात राजीनामा सत्र आणि बंडाळी सुरू झाल्याने वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. Mumbai BMC Latest News
वांद्रेत मनसेला खिंडार: 11 वर्षांची साथ सुटली
‘राज-उद्धव’ युतीचे वारे वाहत असताना वांद्रे पूर्व भागात मनसेला मोठा हादरा बसला आहे. प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील मनसेच्या 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. गेल्या 11 वर्षे 9 महिन्यांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या या ‘मनसैनिकांनी’ अचानक साथ सोडल्याने खळबळ उडाली आहे. जागावाटपात हा भाग मित्रपक्षाला गेल्याने किंवा स्थानिक समीकरणांमुळे ही नाराजी ओढवली असल्याची चर्चा असून, वरिष्ठ आता त्यांची मनधरणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड; ‘आयात’ उमेदवारावरून रोष
चांदिवली मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 157, 159 आणि 161 मधील तीन आक्रमक शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावर शाखाप्रमुखांनी गंभीर आरोप केले आहेत.
नाराजीचे कारण: प्रभाग 161 मध्ये निष्ठावंत मराठी कार्यकर्त्याला डावलून, पैशाच्या जोरावर गेल्या वेळी ‘एमआयएम’कडून लढलेल्या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप शाखाप्रमुखांनी केला आहे. उमाकांत भांगिरे, प्रशांत नलगे आणि बाळकृष्ण गटे या शाखाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे चांदिवलीत शिवसेनेची ताकद धोक्यात आली आहे.
भाजपच्या गोटातही ‘बंडाचा’ झेंडा;
वर्सोवा आणि वॉर्ड 173 मध्ये टेन्शन
केवळ ठाकरे गटच नाही, तर शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपच्या डोक्यालाही बंडखोरांनी ताप दिला आहे.
वर्सोवा (वॉर्ड 60): भाजपच्या अधिकृत उमेदवार सायली कुलकर्णी यांच्या विरोधात दिव्या ढोले यांनी शड्डू ठोकला आहे. “जनतेच्या मागणीसाठी निर्णय घेण्यास धैर्य लागते,” असे म्हणत त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
वॉर्ड 173 (भावनिक आवाहन):
भाजपचे नेते दत्ता केळूसकर सध्या ‘नॉट रिचेबल’ असून त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. येथे शिवसेनेच्या पूजा कांबळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार असताना, केळूसकर यांनी आपल्या पत्नी शिल्पा केळूसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. “आता आर-पारची लढाई,” असे म्हणत त्यांनी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…