•महाविकास आघाडीमधुन जुन्नर विधानसभेवर शिवसेनेचा दावा? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना विलास वाव्हळ यांचे आव्हान?
मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार दोन्ही युतीतील नेत्यांकडून विधानसभेच्या उमेदवारी करिता मोर्चेबांधणी चालू झाली असताना तेली समाजाकडून आता मोठे मागणी करण्यात येत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ-आळेकर यांना उमेदवारी मिळावी याकरिता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे तेली समाजाकडून मागणी केली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्नर मतदार संघावर विलास वाव्हळ आळेकर यांना उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह तेली समाजाने केला आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
पक्ष फुटी नंतर विलास वाव्हळ पक्ष बांधणी करिता अहोरात्र मेहनत घेतल्याचे बोलले जाते. तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून विलास वाव्हळ यांना पाहिले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. विलास वाव्हळ-आळेकर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाते.तसेच जुन्नरकरांच्या प्रश्न बाबत सदैव अग्रस्थानी असतात, बहुतांश जुन्नरकरांचे तसेच तेली समाजाची विलास वाव्हळ यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडी कडून संधी मिळावी अशी मनोभावना असल्याचे म्हटले जात आहे.
विलास वाव्हळ आळेकर कोण आहे?
विलास वाव्हळ आळेकर मागील 35 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष संघटक आणि पक्ष कार्यकारी सदस्य, बृहन महाराष्ट्र तेली समाज, संताजी तेली क्रांती मोर्चा चे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहे. शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख ,पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदावर असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीमध्ये निवडून आणण्याकरिता प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे. तसेच महाराष्ट्र सह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात 28 विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघांमध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वाव्हळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नर सह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. त्यामुळे विलास वाव्हळ यांना महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून संधी मिळाली तर अजित पवार गटाचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…