मुंबई

Telegram Fraud : टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून लाखोंची ऑनलाईन फसवणूक

•शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध

ठाणे :- आशुतोष कुमार मनोरंजन तिवारी (29 वर्ष) यांची टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून 24 लाख 66 हजार 225 रुपयाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांकडून फसवणूक केलेल्या या टेलिग्राम ग्रुपच्या शोध घेतले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडले गाव येथे राहणाऱ्या अशितोष कुमार मनोरंजन तिवारी यांना टेलिग्राम वरून टेलिग्राम ॲप मधील शॉपर अपलोड या ग्रुपमध्ये विविध उत्पादन रेटिंग व आयपीओ याबद्दल माहिती दिली. त्यानंतर खरेदी-विक्री केल्यास अधिकचा नफा मिळाल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आशुतोष कुमार यांनी त्या ॲपद्वारे तब्बल 24 लाख 66 हजार 225 रुपयांची शेअर्स खरेदी केले होते. तसेच यावर मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असे अमिष दाखवले होते. परंतु कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केलेले पैसे आणि नफ्याचे पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

36 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago