Telegram Online Scam : टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील रक्कम गोठविण्यात यश आले.
विरार :- टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे Telegram Scam जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. Vasai Virar Police या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील 2 लाख 55 हजार 107 रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले. ‘टेलिग्राम अँप वरून’ ग्रुपवरून शेअर मार्केट करिता ट्रेडिंग केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत विरार येथील चौधरी यांचे 2 लाख 55 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्राम ॲप वरुन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चौधरी यांना ऑनलाइन ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात आली होती. ट्रेडिंग करण्यासाठी चौधरी यांनी दोन लाख 55 हजार रुपयांची ऑनलाइन गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रकमेत कोणताही नफा परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात चौधरी यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal तक्रारदार दाखल केली होती. पोलिसांनी यानंतर फसवणुकीतील रक्कम शोधन घेऊन सर्व रक्कम पोलिसांनी गोठविण्यात यश आले. पोलिसांनी न्यायालय आणि बँकेची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम चौधरी यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नाडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, प्रशांत बोरकर महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…