मुंबई

Tejasvee Ghosalkar : महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे गटाची महिला फळी सज्ज!

तेजस्वी घोसाळकर यांना पुन्हा संधी; नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम!

मुंबई | मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महिला नेतृत्वाची नवी मांडणी करण्यात आली आहे. विधानसभा प्रमुख, संघटक आणि संचालिका अशा विविध पदांवरील नियुक्त्यांची यादी जाहीर करत पक्षाने रणधुमाळीची दिशा स्पष्ट केली आहे.

या यादीत दहिसर विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे नाव कायम ठेवण्यात आले असून, यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता, आणि त्या पक्षात सक्रिय नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, आणि आपण पक्षातच असल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर, नव्याने यादीत त्यांना स्थान देण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

गौरी चौधरींची बढती, घराणेशाहीवरून कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज

दरम्यान, शिवडी विधानसभा प्रमुखपदी आमदार अजय चौधरी यांच्या स्नुषा गौरी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना संघटकपद देण्यात आले होते, तेव्हाही स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली होती. तरीही आता त्यांना आणखी वरचं पद दिल्यानं पक्षात घराणेशाहीचं वाद पुन्हा उफाळून आलं आहे.

महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या तयारीत असताना, ही महिला फळी पक्षासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र नव्या नेत्यांना प्राधान्य दिल्यानं अनेक जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं जाईल का, असा सवाल आता पक्षातील गटांमध्ये चर्चिला जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

32 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago