मुंबई

Team India Mumbai Parade: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची मुंबईत विजय परेड, रोहित शर्माने देशवासीयांना केले भावनिक आवाहन, 4 जुलैला काय होणार बघा

Team India’s T20 World Cup Victory Parade: भारतीय क्रिकेट संघ 4 जुलै रोजी मायदेशी परतत आहे, रोहित ब्रिगेड प्रथम दिल्लीत येणार आहे. यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेल, त्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना होईल. अशा स्थितीत भारतीय संघ दिवसभर व्यस्त राहील. मुंबईत भारतीय संघासाठी विजय परेडचेही आयोजन करण्यात आले आहे, वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल.

मुंबई :- टीम इंडिया (Team India) 4 जुलैला मायदेशी परतत आहे, टीम इंडिया सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचेल. दिल्लीत पोहोचल्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेणार आहे. यानंतर भारतीय संघ मुंबईला रवाना होईल. अशा स्थितीत भारतीय संघाचे वेळापत्रक दिवसभर अतिशय व्यस्त असणार आहे. मुंबईत भारतीय (Team India In Mumbai) संघासाठी विजय परेडचेही आयोजन करण्यात आले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (BCCI President Jay Shah) यांनी ही घोषणा केली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला असून अनेक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच पर्यायी मार्गाचाही अवलंब पोलिसांनी उपलब्ध करून दिला आहे. Mumbai Roads Tomorrow | Check Routes To Avoid

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले – वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाच्या परेडमध्ये सामील Team India’s T20 World Cup Victory Parade व्हा. जय शाहने पुढे लिहिले- आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजता मरीन ड्राइव्ह (Marine Drive) आणि वानखेडे स्टेडियमवर पोहोचा, (Wankhade Stadium) तारीख लक्षात ठेवा. Mumbai Roads Tomorrow | Check Routes To Avoid

रोहित शर्मानेही या विजय परेडबाबत भावनिक आवाहन केले. रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे- आम्ही तुम्हा सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग 4 जुलै रोजी सायंकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे येथे विजय परेड करून हा विजय साजरा करूया.

वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल (Mumbai 4th July Traffic Update)

एन.सी.पी.ए ते मेघदूत ब्रिज पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता उत्तर वाहीनी बंद राहील.

पर्यायी मार्ग :-

०१. रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाईन्स चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) पुढे इच्छित स्थळी जातील.

०२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे सी.टी.ओ जंक्शन-सी.एस.एम.टी पुढे इच्छित स्थळी जातील. ३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग सी.टी.ओ जंक्शन- मेट्रो जंक्शन श्यामलदास जंक्शन डावे वळण- प्रिंसेस स्ट्रिट मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.

मेघदूत ब्रिज (प्रिसेंस स्ट्रि ब्रीज) ते एन.सी.पी.ए / हुतात्मा राजगुरु चौक (मंत्रालय जंक्शन) करीता सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

पर्यायी मार्ग :-

०१. केम्स कॉर्नर ब्रिज येथुन डावे वळण घेवुन नाना चौक येथुन पुढे इच्छित स्थळी जातील.

०२.आर.टी.आय जंक्शन येथुन डावे वळण घेवुन एन. एस पाटकर मार्ग– पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) डावे वळण. एस. व्ही. पी रोड तसेच
पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) येथे उजवे वळण घेवुन महर्षी कर्वे मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.

३.विनोली चौपाटी- डावे वळण ऑपेरा हाऊस उजवे वळण महर्षी कर्वे मार्गे-पुढे इच्छित स्थळी जातील.

४.मेघदूत ब्रिज (प्रिसेंस स्ट्रि ब्रीज)

अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) ते किलाचंद चौक (सुंदरमहल जंक्शन) उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील

पर्यायी मार्ग :-

महर्षी कर्वे रोड मार्गे अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) –

मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) जंक्शन मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील

दिनशॉ वाच्छा मार्गे हा डब्ल्यु, आय.ए.ए चौक ते रतनलाल बुबना चौक

पर्यायी मार्ग :-

(मरीन प्लाझा जंक्शन) असा उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

महर्षी कर्वे रोड मार्गे अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन)- मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) जंक्शन पुढे इच्छित स्थळी जातील.

हुतात्मा राजगुरु चौक (मंत्रालय जंक्शन) ते वेणुताई चव्हाण चौक (एअर

इंडीया जंक्शन) पर्यंत उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील

महर्षी कर्वे रोड मार्गे रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाईन्स-चर्नी रोड- पंडीत पलुस्कर

चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.

फि प्रेस जर्नल जंक्शन येथुन एन.एस रोडला येणारी उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्य वाहनांकरीता बंद राहील.

विनय के शहा मार्ग (स्थानिक रहीवाशी व अत्यावश्यक वाहने वगळून)

जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक असा उत्तर वाहीनीने एन.एस. रोडकडे जाणारा विनय के शहा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. (स्थानिक रहीवाशी व अत्यावश्यक वाहने वगळून)

टीम इंडियाचा 4 जुलैचा कार्यक्रम

गुरुवारी सकाळी 6 वाजता विमान दिल्लीत उतरेल. – भारतीय खेळाडू सकाळी 9.30 वाजता पीएम हाऊससाठी रवाना होतील. – टीम इंडिया सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. – पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर खेळाडू चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला जातील. – मुंबईत उतरल्यानंतर सर्व खेळाडू खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील. – मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून विजय परेड होईल. Mumbai Roads Tomorrow | Check Routes To Avoid

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0