मुंबई

Team India 2025 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलकडे कर्णधारपद, रवींद्र जडेजा उपकर्णधार

India Vs West Indies : बुमराहची संघात वापसी; साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कलसह युवा खेळाडूंना संधी

ANI :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज (25 सप्टेंबर) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिल संघाचे कर्णधारपद सांभाळणार असून, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे.

युवा खेळाडूंना मिळाली संधी

या संघात युवा प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, नितीशकुमार रेड्डी आणि एन. जगदीसन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. संघात एकूण 7 फलंदाज, 4 अष्टपैलू आणि 4 गोलंदाजांचा समावेश आहे.

फलंदाज: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), एन. जगदीसन (यष्टिरक्षक).

अष्टपैलू: रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी.

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर आहे, तर करुण नायरला संघातून वगळण्यात आले आहे.

मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

वेस्ट इंडिजचा संघ रोस्टन चेसच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यांच्या संघात जोमेल वारिकन, शे होप, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

vivek

Recent Posts