मुंबई

IPS Transfer List : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट; 51 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यभरातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काहींना बढती, काहींना पदोन्नती

मुंबई | महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जात असून, यंदा तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून, काहींना पदावनतीच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर हालचाल आणि अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत नव्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यभरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव, संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेषतः मुंबईत तब्बल पाच नवीन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तुषार पाटील, विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे. ही सर्व नेमणुका पदोन्नतीच्या आधारावर करण्यात आल्याची माहिती आहे.

पुण्यात देखील मोठा फेरबदल करण्यात आला असून, शस्त्र निरीक्षक शाखेतील तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 मध्ये समादेशकपदी बदली झाली आहे. महेंद्र पंडित यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व परिमंडळ-2 चे उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी तीन नवीन आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे.

बदली झालेल्या आयपीएस अधिकाऱ्या यादी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0