•तळेगाव दाभाडेत राष्ट्रवादी-भाजप युतीची विजयी सलामी; उत्तर पुणे जिल्ह्यात ‘कमळ’ फुलल्याचा भाजपचा दावा
पुणे :- आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजयाची सलामी दिली आहे. तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेत मिळून एकूण चार जागांवर नगरसेवकांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपची युती झाली आहे. या युतीमध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता खळदे यांची, तर प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे दीपक भेगडे आणि शोभा परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे निखिल भगत हेही बिनविरोध निवडून आले आहेत. तळेगावमध्ये एकूण 28 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्याने आता 24 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
दुसरीकडे, लोणावळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते देविदास कडू यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. लोणावळ्यात एकूण 27 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाल्याने आता 26 जागांसाठी निवडणूक होणार आहे
भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांनी या निकालावर आनंद व्यक्त केला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत भाजपने खाते उघडले असून उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपच्या विजयाची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…