Talathi Bribe : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर याची कारवाई ; तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठीला लाचलुचपत Talathi Bribe प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचखोरीचा ताजा ट्रेड तलाठयाचा लाजिरवाण्या कृत्याचा पर्दाफाश,भडका उडाला.
धाराशीव :- कळंब तालुक्यातील आंदोरा सज्जाचे तलाठी कल्याण शामराव राठोड (43 वर्ष) यांना तीन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तलाठी ने तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंत तीन हजार रुपये लाच स्वीकारताना लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अटकला आहे.
तलाठ्याची लाच गाथा:तो चोर आहे की बळी.? छत्रपती संभाजी नगरात उघड झाले सत्य
तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून यातील तलाठी कल्याण शामराव राठोड (43 वर्ष) याने दिनांक 14 मे 2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 4 हजार लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3 हजार लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तलाठी कल्याण शामराव राठोड यास ताब्यात घेण्यात आले आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर तसेच सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस अमलदार सहाय्यक फौजदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांनी लाचखोर तलाठीला अटक केली आहे.