क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Dombivli Vishnunagar Police : नकली विदेशी दारूचा अड्डा डोंबिवलीत डोकेदुखी! कारवाईनंतरही ‘मच्छ्या’ निर्ढावलेला!

Dombivli Vishnu Nagar Police Busted Daru Adda : देवीचापाडा परिसरात 24 तास चालणाऱ्या अड्ड्यावर कठोर कारवाईची मागणी; पोलिसांच्या कारवायांनाही जुमानत नसल्याने रहिवासी त्रस्त!

डोंबिवली :- विष्णुनगर पोलिसांनी Vishnu Nagar Police आपल्या हद्दीतील गावठी दारूचे पाच अड्डे उद्ध्वस्त केले असतानाच, आता देवीचापाडा येथील एका नकली विदेशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी लावून धरली आहे. हा अड्डा चालवणारा मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ ‘मच्छ्या’ हा पोलिसांना दाद देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. Dombivli Latest Crime News

देवीचापाडा येथील सत्यवान चौकाजवळील हनुमान मंदिराजवळील भोईर सदन संकुलाजवळील नागरी वस्तीत हा नकली विदेशी दारू विक्रीचा अड्डा दिवसा-रात्र चोवीस तास सुरू असतो. या अड्ड्यावर कष्टकरी, मजूर, नेपाळी रखवालदार आणि शहरातील व्यसनी मोठ्या संख्येने येत असतात. येथे कमी किमतीत नकली विदेशी दारू मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. दारू पिऊन अनेक जण याच परिसरात भांडणे, हाणामाऱ्या आणि गैरवर्तन करतात. यामुळे परिसरात घाण आणि कचरा होत असल्याने रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी विष्णुनगर पोलिसांनी दोन वेळा या दारू अड्ड्यावर छापा मारून कायदेशीर कारवाई केली होती. मात्र, एवढी कारवाई होऊनही मच्छिंद्र पाटील हा पोलिसांना दाद देत नसल्याचे दिसत आहे. कारवाई झाल्यानंतर काही दिवस तो घराच्या परिसरात दारूसाठा करून ग्राहकांना प्लास्टिक पिशवीतून दारू विक्री करून अड्डा चालू नाही असा देखावा उभा करतो आणि नंतर पुन्हा तोच प्रकार सुरू करतो.

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी आपल्या पोलीस पथकासह या अड्ड्यावर अचानक छापा टाकून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ‘हा अड्डाच आपले उपजीविकेचे साधन आहे,’ अशा प्रकारचा देखावा उभा करून हा दारू अड्डा चालक पोलिसांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, परिसरातील रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन आणि पोलिसांच्या कारवायांनाही किंमत न देणाऱ्या या चालकावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0