
Mumbai IPS Transfer News : राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल इथे नियुक्ती तर यशस्वी यादव यांची अप्पर पोलीस महासंचालक सायबर सेल येथे नियुक्ती
मुंबई :- राज्यात नवीन सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश निघाले. त्यानुसार आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Mumbai IPS Transfer News त्यानंतर आता वरिष्ठ 13 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्य कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशस्वी यादव यांची अपर पोलीस महासंचालक सायबर सेल या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने तेरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे जीआर काढले आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
1.मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
2.आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
3.शोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
4.राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल
5.निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था.
6.सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
7.यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल
8.सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
9.अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग.
10.छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान
11.के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन
12.अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
13.श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा