मुंबई

Eknath Shinde : “डिनोने तोंड उघडलं, तर अनेकांचा ‘मोरया’ होईल!” — एकनाथ शिंदेंची विधानसभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

  • Eknath Shinde On Uddhav Thackeray “सिमेंट काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड आमचं काम बोलतंय; तुमचं भ्रष्टाचार झाकतोय”

मुंबई | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि जहाल शब्दांत टीका केली. “डिनो मोरियाने जर तोंड उघडलं, तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल,” असं म्हणत शिंदेंनी गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना इशाराच दिला.

शिंदे म्हणाले, “सिमेंट काँक्रीटचे रस्ते 25 वर्ष दुरुस्तीविना टिकतात, मग दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोणी पैसे उकळले? आम्ही ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ चालवलं, पण तुमचे लोक तिजोऱ्या धुत होते.” मिठी नदीतील कामात डिनो मोरियाचा सहभाग विचारत त्यांनी सूचकपणे ‘डिनो’वरून अनेकांचे बिंग फुटण्याचा इशारा दिला.

याच भाषणात शिंदे यांनी ठाकरेंच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटलं, “जे खुद शीशेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगड फेकू नये. आम्ही कोस्टल रोड पूर्ण केला, सिमेंट रस्त्यांचे काम केलं, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा मिळवला. पण तुमच्या काळात पालिकेला सोन्याची अंडी देणारी हसवणूक समजून बड्या लोकांनी तिचा वापर केला.”

“पत्राचाळ घोटाळा, खिचडी कंत्राट, बॉडी बॅग प्रकरणं कुणाच्या काळात झाली? गिरणी कामगार, सफाई कामगारांचे प्रश्न सोडवणं आमचं उद्दिष्ट आहे,” असं सांगत शिंदे यांनी आपली बाजू मांडली.राज्याचं अधिवेशन जसजसं पुढे सरकत आहे, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी चांगलीच उफाळून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0