मुंबईठाणे
Trending

Thackeray Group : शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने तणाव; ठाकरे गट आक्रमक

Thackeray Group On Mumbai Police And Maharashtra Sarkar : पोलीस आणि सरकार काय करतंय?’ अनिल देसाईंचा सवाल; ही घटना निषेध करण्यापलीकडची असल्याचे मत

मुंबई :- दादर येथील शिवाजी पार्क मैदानाजवळ असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे Minatai Thackeray यांच्या पुतळ्यावर काही अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई यांनी तातडीने शिवाजी पार्कला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार देसाईंनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पुतळ्यावर रंग फेकणारे हे कदाचित भेकडाच्या अवलादी असावेत. अशा घटना घडत असताना पोलीस यंत्रणा आणि सरकार काय करतंय, असा प्रश्न पडतो. ही घटना फक्त निषेध करण्यापलीकडची आहे. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत आहे.”

‘आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ’

अनिल देसाई यांनी, या घटनेची माहिती शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे सांगितले. “आम्ही आमच्या पद्धतीने या भेकडांना योग्य प्रत्युत्तर देऊ. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे,” असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर फेकलेला रंग पुसून त्याची स्वच्छता केली.

शिवसेना (उबाठा) नेत्या विशाखा राऊत यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. “सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. त्यानंतर हा प्रकार घडला. आमच्या कार्यकर्त्यांनी रंग पुसून टाकला, पण पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न पडतो,” असे त्या म्हणाल्या. या घटनेमुळे मुंबईच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0