मुंबई
Trending

Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरण : डिनो मोरिया ईडीच्या चौकशीत हजर

Mithi River Scam : आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी अभिनेता डिनो मोरिया आणि भावाची ईडीकडून कसून चौकशी

मुंबई | मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात 65 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार उघडकीस आल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया याला चौकशीसाठी तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश दिले. Mithi River Scam त्यानुसार डिनो सकाळी 10.30 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचा भाऊ सॅन्टिनोही होता.

या घोटाळ्याच्या तपासासाठी ईडीने यापूर्वी मुंबई आणि कोचीसह 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात मुंबई महापालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी आणि दोन कंपन्यांवर फसवणुकीचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. यामध्ये डिनो मोरियाचे नाव आर्थिक व्यवहाराच्या चौकटीत असल्यामुळे ईडीकडून त्याची चौकशी केली जात आहे. डिनो मोरिया हा युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो.

2019 ते 2022 दरम्यान डिनो मोरिया आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवरच डिनो आणि त्याच्या भावाची सविस्तर चौकशी सुरू आहे. याआधी 14 जून रोजीही त्यांची साडेचार तास चौकशी झाली होती.

मुंबई पोलिसांनी या गैरव्यवहारप्रकरणी भारतीय दंड विधानातील गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून, 65 कोटी 54 लाख रुपयांच्या नुकसानाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात पालिकेचे सहाय्यक अभियंते, उपमुख्य अभियंते तसेच पाच प्रमुख कंत्राटदार कंपन्यांचे संचालक आरोपी आहेत. आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ईडीचे तपास अधिकारी याप्रकरणी मालमत्तांची पडताळणी, आर्थिक व्यवहारांचा स्रोत आणि संपूर्ण व्यवहारसाखळीचा शोध घेत आहेत. चौकशीतून या घोटाळ्यामागील वास्तव हळूहळू समोर येत असल्याचे संकेत उच्चस्तरीय सूत्रांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0