Bihar Election News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू; 121 जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत

Bihar Election Latest News : तेजस्वी यादव, सम्राट चौधरी आणि मैथिली ठाकूर यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघाकडे देशाचे लक्ष
ANI :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधील 121 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी 75 लाख 13 हजार हून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या 121 जागांसाठी एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. Bihar Election Latest News
या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवांच्या राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या तारापूर तसंच गायिका मैथिली ठाकूर यांच्या अलीनगर या महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. रघुनाथपूर, गोपालगंज, महुआ, बक्सर, दानापूर, मणेर, लखीसराय, मुंगेर आणि एकमा हे मतदारसंघही लक्षवेधी ठरत आहेत.
निवडणुकीच्या प्रचारात महागठबंधानाकडून प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले गेले आहे, तर दुसरीकडे एनडीएने लाडकी बहीण योजना, जंगलराज मुक्त बिहार आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचे व्हिजन असे मुद्दे प्रचारात आणले.
बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
आज कोणत्या मतदारसंघासाठी मतदान होणार?
आलमनगर, बिहारीगंज, सिंहेश्वर (SC), मधेपुरा, सोनबरसा (SC), सहरसा, सिमरी बख्तियारपूर, महिसी, कुशेश्वर अस्थान (SC), गौरा बौरम, बेनीपूर, अलीनगर, दर्बहंग, दरबहंग, दरबहंग केओटी, जाले, गायघाट, औरई, मिनापूर, बोचाहान (SC), साकरा (SC), कुधनी, मुझफ्फरपूर, कांती, बरूराज, पारू, साहेबगंज, बैकुंठपूर, बरौली, गोपालगंज, कुचायकोट, भोर (SC), हथुआ, सिवान, जिरादेई, दारगुंड, दारौली, दारौली गोरियाकोठी, महाराजगंज, एकमा, मांझी, बनियापूर, तरैया, मधौरा, छपरा, गारखा (SC), अमनौर, परसा, सोनपूर, संदेश, बरहार, आरा, अगियाओन (SC), तारारी, जगदीशपूर, शाहपूर, ब्रह्मपूर, बक्सर, डुमराव, राजपूर (SC) यांचा समावेश आहे.



