Pune Crime News : गांजा तस्करी आणि विक्री प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केले अटक

•Police police absconded accused in ganja smuggling गुन्हे शाखा युनिट-6 यांची कारवाई
पुणे :- वाघोली पोलीस ठाण्यातील एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केलेल्या फरार आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 यांनी अटक केली आहे. गांजा तस्करी आणि विक्री प्रकरणातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारीच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट सहाकडील अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे आणि फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक ग्रस्त करीत असताना पोलीस रमेश मेमाणे आणि नितीन घाडगे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, वाघोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस पुण्यातील आरोपी रिजवान इस्माईल शेख (39 वय रा. गोरे वस्ती वाघोली, ता. हवेली, पुणे) बोरे वस्ती वाघोली येथे येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा लसूण आरोपी रिझवान याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासाकरिता लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे .