क्राईम न्यूजमुंबई
Trending

Thane BMC News : पत्रकार विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ; ठाणे पालिका उपायुक्त यांच्याकडे मागितली 25 लाखांची खंडणी

Thane BMC Bribe News : पत्रकाराविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठाणे :- मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभाग सक्षम प्राधिकरण तसेच ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मिनल पालांडे यांच्याकडे 25 लाखांची खंडणी TMC Bribe News मागणाऱ्या पत्रकाराविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात Chitalsar Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे.सुहास उत्तम शिंदे असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या पत्रकाराचे नाव असून त्याचे कार्यालय तीन हात नाका येथे आहे. Thane Latest Crime News

ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणाऱ्या मिनल पालांडे या ठाणे महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सक्षम प्राधिकारी या पदाचा पदभारही आहे. त्यांच्या या कायदेशीर नियुक्तीवर सुहास शिंदे हा शंका घेत होता आणि त्या संदर्भात तक्रारी तसेच बदनामीकारक अर्ज प्राधिकरणाकडे वारंवार करीत होता.तसेच त्याने त्यांना नोकरी घालविण्याची धमकी दिली होती.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयातील कार्यकारी अभियंता राजकुमार पवार यांच्याकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच मिनल पालांडे यांचे परिचित असलेले मुश्ताक खोकर यांच्याकडे तडजोडीअंती 12 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणीचे पैसे देत नसल्यामुळे त्यांच्या मुलीकडे बघण्याची धमकी दिली. नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी मिनल पालांडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील वरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुहास शिंदे अद्याप अटक नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0