Mumbai Accident News : मुंबईच्या कोस्टल रोडवर आलिशान लॅम्बोर्गिनीचा अपघात; भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले

Mumbai Costal Road Lamborghini Accident News : पोलीस चालकावर गुन्हा दाखल, उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी पोस्ट केला अपघाताचा व्हिडिओ
मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या कोस्टल रोडवर (सागरी किनारा मार्ग) आज सकाळी पुन्हा एकदा एका आलिशान लॅम्बोर्गिनी गाडीचा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या या गाडीचा ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी चालक अतिश शहा (52 वय) यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणी वरळी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Mumbai Police Latest News
अपघाताची कारणे
रविवार सकाळी सुमारे 9.30 वाजता हा अपघात घडला. पहाटे झालेल्या पावसामुळे रस्ता ओला झाला होता. दक्षिण दिशेकडे जात असताना, अचानक गाडीवरील ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओल्या रस्त्यामुळे गाडी घसरली आणि हा अपघात झाला. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी गाडीच्या तांत्रिक तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाला (RTO) विनंती केली आहे. Mumbai Coastal Road Latest News
कोस्टल रोडवरील हा अपघात काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला, कारण उद्योगपती आणि कारप्रेमी असलेल्या गौतम सिंघानिया यांनी स्वतः या अपघाताचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि भरधाव वेगाच्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे.


