क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Crime News : वैमानिक महिलेचा टॅक्सीत विनयभंग; पोलिसांकडून तिघांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Latest Crime News : पतीला भेटून परतताना घडली घटना; आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई | मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नांकित करणारी एक घटना गुरुवारी रात्री घडली. नौदल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि वैमानिक असलेल्या 28 वर्षीय महिलेला खासगी टॅक्सीत विनयभंगाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Mumbai Latest Crime News

ही महिला गुरुवारी रात्री कुलाबा परिसरात आपल्या पतीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रात्रीच्या जेवणानंतर त्या एकट्याच टॅक्सीतून पूर्व उपनगरातील घरी जात असताना, चालकाने गाडी एका निर्जन ठिकाणी थांबवली. त्यानंतर गाडीत दोन अनोळखी पुरुष चढले. काही क्षणातच मागे बसलेल्या व्यक्तीने महिलेशी अश्लील वर्तन सुरू केले, तर दुसऱ्याने तिला धमकावले.

दरम्यान, गाडी पोलिसांच्या नाकाबंदीच्या जवळ आली असता, दोन्ही आरोपी गाडी थांबवून पसार झाले. चालकाने महिलेला तिच्या गंतव्य स्थळी पोहचवले आणि तोही नंतर फरार झाला.

पीडित महिलेला शहराबाबत सविस्तर माहिती नसल्याने तिने तातडीने पतीशी संपर्क साधला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांनी मिळून घाटकोपर पोलीस ठाण्यात Ghatkopar Police Station तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0