महाराष्ट्र
Trending

Ambernath Fraud News : युनियन बँक आणि परिवहन विभागाच्या नावाने 6 लाखांची फसवणूक

Ambernath Latest Fraud News : अंबरनाथ आणि बदलापुरात बनावट ॲप आणि चलानचा वापर, सायबर गुन्हेगारांचे नवे तंत्र

अंबरनाथ :- व्हॉट्सॲपवर बनावट ॲपच्या लिंक्स आणि खोटे संदेश पाठवून नागरिकांना फसवण्याचे प्रकार समोर आले आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अशाच दोन घटनांमध्ये तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, नागरिकांना अशा बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Ambernath Latest Fraud News

अंबरनाथमधील प्रकार

अंबरनाथ पूर्वेकडील एका व्यक्तीला त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर युनियन बँक ऑफ इंडियाच्या बोधचिन्हाचा एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना बँकेचे ॲप सुरू करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली होती. त्यांनी लिंकवर क्लिक करून ॲप सुरू करताच, त्यांच्या खात्यातून तब्बल 4 लाख 98 हजार 993 रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बँकेकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना मिळालेले ॲप बनावट असल्याचे समजले. यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

बदलापूरमध्ये परिवहन विभागाच्या नावाने फसवणूक

दुसऱ्या एका घटनेत, बदलापूर येथील एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर परिवहन विभागाचे एक बनावट चलन (चालान) आले. हे चलन भरण्यासाठी त्यांना गुगल पेचा वापर करण्यास सांगण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खात्यातून 1 लाख 89 हजार रुपये वळवण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी राजा राम, शाबाझ खान, दीपक कुमार शॉ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. बनावट व्हॉट्सॲप लिंक्स किंवा खोट्या खात्याच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अज्ञात क्रमांकावरून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेच्या ॲपसाठी थेट त्यांच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲप स्टोअरचा वापर करा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0