मुंबई
Trending

‘Shefali Jariwala Death : कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन; मनोरंजन विश्वात शोककळा!

Shefali Jariwala Death : हृदयविकाराच्या झटक्याने शेफाली यांचे निधन, वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | ‘कांटा लगा’ या आयकॉनिक गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली आणि अनेकांच्या आठवणीत अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला Shefali Jariwala Death हिचं हृदयद्रावक निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. तिला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत आणण्यात आलं होतं.

शेफालीच्या निधनाची धक्कादायक बातमी सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांनी दिली. त्यानंतर तिचे सहकारी व बिग बॉस स्पर्धक राजीव अडातिया, अली गोनी आणि गायक मिका सिंग यांनीही या दु:खद घटनेची पुष्टी केली. शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागी याचे रुग्णालयाबाहेरील व्हिडीओही समोर आले असून, त्यात त्याचा दुःखाने सुन्न झालेला चेहरा स्पष्ट दिसतो.

डॉक्टरांनी तपासणीनंतर शेफालीला मृत घोषित केलं. तिचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात भावनिक श्रद्धांजली वाहिली असून, “हे खरं आहे का?” अशा अविश्वासदर्शक प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेफाली जरीवालाने ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडीओमुळे झपाट्याने प्रसिद्धी मिळवली होती. तिने तिचा जोडीदार पराग त्यागीसोबत ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. शिवाय ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रासोबत विशेष भूमिका साकारली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0