मुंबई

Mumbai Accident News : रस्त्यावर जीवघेणं संकट! अंधेरीत रिक्षाच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू

अपघातानंतर चालकाने घेतली पळ काढ, पोलिसांनी काही तासांत लावला छडा

मुंबई | अंधेरी-कुर्ला रोडवर मेट्रो स्टेशन क्रमांक 4 जवळ सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता ओलांडत असताना एका अंदाजे 60 वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. यात ते जागीच कोसळले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वृद्धाला डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक तपासात समोर आलं की, मृतक गेल्या काही दिवसांपासून परिसरात फिरत होता आणि उपजीविकेसाठी भिक्षा मागत होता.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एका रिक्षाने वृद्धाला उडवल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्या रिक्षाचा नंबर ओळखून काही तासांत चालकाला ताब्यात घेतलं. चालकाचं नाव सोहराब महफूज हुसैन शेख असं असून, त्याने अपघात कबूल केला आहे. रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0