मुंबई

Uddhav Thackeray Shivsena : निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

•Bharat Kokate News : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश; भाजपाची ताकद वाढणार,नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ

मुंबई :- राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. सिन्नर तालुक्यातील महत्त्वाचे नेते आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

पक्षप्रवेशाला महत्त्व का?

भारत कोकाटे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर हा निर्णय घेतल्याने याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत कोकाटे यांनी 2022 साली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी भाजपची वाट धरली आहे.

कोण आहेत भारत कोकाटे?

भारत कोकाटे हे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही भावांमध्ये राजकीय मतभेद आहेत. भारत कोकाटे हे सोमठाणे गावाचे सरपंच राहिलेले आहेत. तसेच, त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे.

सिन्नर तालुक्यात भारत कोकाटे यांची चांगली राजकीय ताकद मानली जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल. मी भारत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0